$15 – $45

Diwali Marathi Natak 2017 - 'Vatvat Vatvat' (written by Pu La Deshpande, pr...

Event Information

Share this event

Date and Time

Location

Location

Emmanuel United Church

22 Bridgeport Road West

Waterloo, ON N2L 2Y3

Canada

View Map

Refund Policy

Refund Policy

Refunds up to 7 days before event

Friends Who Are Going
Event description

Description

Program:

3:00 PM - Registration + Meet & Greet hour with light Diwali snacks and tea

4:15 PM sharp - Pu. La. Deshpande's Marathi Comedy Natak -- 'Vatvat Vatvat' directed by Dr. Prakash Khare.

6:00 PM - Delicious Diwali dinner

On-site and on-street parking available

Please email ulka_khare@hotmail.com for further questions.

Synopsis:

शेक्सपियरनी म्हटलंय - 'आयुष्य म्हणजे वटवट आणि आदळआपट करून सांगितलेली एक अर्थशून्य कथा आहे'. अशा अर्थशून्य कथेतील अर्थ धुंडाळण्याचा व्यर्थ प्रयत्न करण्यापेक्षा त्या कथेचा निखळ आनंद घेण्याचा एक दृष्टिकोन देणारं नाटक म्हणजेच पु. ल. देशपांडे लिखित 'वटवट वटवट'. आपल्या दैनंदिन जीवनातील धांदल आणि फजितीचे बहुतांश प्रसंग दाखवणारं आणि तरीही त्यावर स्वतःलाच हसायला भाग पाडणारं नाटक म्हणजे 'वटवट वटवट'.

प्रेमिकांची वटवट, प्रेमानंतर अनायासे येणाऱ्या गृहस्थाश्रमातील "कुटुंबाची" वटवट, भांडणाची वटवट, संसारातल्या शीतयुद्धाची वटवट,ऑफिसात साहेबांचे "मधुर" संबंध, बदलती पोशाखसंस्कृती आदि गॉसिप्सच्या निमित्तानी होणारी वटवट, देवदेवतांचीही वटवट, रेडिओ स्टेशनवर रोजच्या भरगच्च वेळापत्रकानुसार चर्चासत्रे, मंत्र्यांच्या मुलाखती, भावगीते, श्रुतिका ह्या अनुषंगाने होणारी वटवट - अशा वैविध्यपूर्ण प्रसंगांतून पुलंनी आपणा सर्वांच्या वटवट करण्याच्या आणि वटवट ऐकण्याच्या अचाट क्षमतेचे यथार्थ दर्शन घडवले आहे. विशेष म्हणजे अशा सर्व प्रसंगांचे सहज-सुलभ आणि विनोदी शैलीतील परंतु अत्यंत मार्मिक असे सादरीकरण खास पुलंच्या चष्म्यातून बघण्याची आणि अनुभवण्याची गंमतच एकदम न्यारी.

सध्याच्या धकाधकीच्या युगात स्ट्रेस फ्री राहण्यासाठी आयुष्याचं तत्वज्ञान, त्यातील समस्या, त्यांचे निराकरण इत्यादि विषयांवर पाल्हाळिक शैलीत विवेचन करणारे मित्र-मैत्रिणी, सेलिब्रिटीज तथा अध्यात्मिक गुरूंचे उपदेशात्मक कार्यक्रम ह्यात आपला वीकेंड "नेहमीप्रमाणे बोरिंग" जातो आहे,असे वाटतेय का? आयुष्य जगण्याच्या "आदर्श" पद्धती शिकण्यासाठी महाराष्ट्रीय आणि नॉन-रेसिडेंशिअल महाराष्ट्रीय जनांना अशा कटु "औषधींची" अजिबात आवश्यकता नाही कारण पुलंनी त्यांच्या जादुई लेखणीतून आपल्या सर्वाना अशी ही मजेदार 'वटवट' भेट म्हणून दिलेली आहे!!

Share with friends

Date and Time

Location

Emmanuel United Church

22 Bridgeport Road West

Waterloo, ON N2L 2Y3

Canada

View Map

Refund Policy

Refunds up to 7 days before event

Save This Event

Event Saved